राजुरेड्डी यांना अर्ध्यारात्री अटक ते गोळीबार?

 





घुग्घूस : शहरातील तिलक नगर वस्तीत सन 29 मार्च 1982 रोजी येल्लारेड्डी यांच्या घरी पुत्ररत्न जन्माला आले 

येल्लारेड्डी हे एसीसी येथे नोकरीला होते 

त्यांना चार मुले होती आई कलावती या गृहिणी होत्या राजुरेड्डी हे सर्वात लहान होते.


खाणारे दहा हात व कमावणारी दोन हात असल्याने घराची आर्थिक परिस्थिती अंत्यन्त बेताचीच होती 

त्यामुळे रेड्डी यांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागले कमी वयातच त्यांनी कामधंद्या कडे स्वतः ला वळवून घेतले

लहानपणी ब्रेड विकणे, पेपर टाकणे, वीट भट्टीवर काम करने, अशी कामे करीत करीत एसीसी कंपनीत मिस्त्रीकडे हेल्पर बनून कामावर लागले कामातील बारकावे शिकून त्यांनी हेल्परी सोडून सुपरवायजर म्हणून काम केले.


 *सुपरवायजर ते सिव्हिल कॉन्टॅक्टर* हा प्रवास खुपच खडतर होता.

कामगारांची जमावा जमव करतांना त्यांच्या वेतनाची व्यवस्था करने हे तारेवरची कसरत होती.

हे आव्हान त्यांनी समर्थपणे पार पाडले व साईराज सिव्हिल कॉन्टॅक्टरचा शहरात उद्यय झाला 


 *कॉन्टॅक्टर ते काँग्रेस अध्यक्षपद* 

 *एक वेगळा प्रवास जीवघेणा संघर्ष*


सलग अठरा वर्ष ठेकेदारी केल्या नंतर सामाजिक बांधलीकी म्हणून रेड्डी यांनी स्वतः ला समाजसेवेत झोकून दिले 

गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक खर्च उचलणे 

धार्मिक मंदिर व सभागृहाचे मोफत निर्माण करने गोरगरीब वंचिताना आर्थिक मदत करने हे नित्याचेच झाले 


 *अंतिम संस्कारा करीता मोफत लाकडे* 

मानवच्या जीवनात मृत्यू हे सर्वात दुःखदायक स्तिथी असते जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूने दुःखाचा डोंगर कोसळतो अश्यात जर आर्थिकस्तिथी योग्य नसली तर दुःखाला अंतच नसतो 

अश्या गंभीर परिस्थितीत निराधार असह्यय व आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांकरीता स्मशाना पर्यत मोफत लाकडे पोहचविण्याचे पवित्र कार्य आज एक चळवळ झाली असून आता पर्यंत शेकडो लोकांना मोफत लाकडे पुरविली व हा सामाजिक कार्य निरंतर शुरुच आहे.


 *कोरोना योद्धा* 


भारताने अशी महामारी गेल्या पन्नास वर्षात कधीच पहिली नव्हती याकाळात जिवंत राहणे हेच सर्वात मोठा ईश्वरीय वरदान होते.

रातोरात लागलेल्या संचारबंदीने हातावर आणून पानावर खाणाऱ्या नागरिकांचे जगणं कठीण झाले छोटे व्यावसायिक मजूर बांधवांचे हाल झाले 

परप्रांतीय मजूर जागोजागी अडकून पडले अश्या कठीण काळात रेड्डीने मदतीचा हात पुढे करीत आपल्या समर्थक व मित्रांना घेऊन हेलपिंग हॅन्ड या संस्थेची स्थापना करीत शहरातील नागरिकांना मोफत अन्न, अनाजकीट व शेकडो परप्रांतीय कामगारांना त्यांच्या घरा पर्यंत पोहचविले.


 *जलसेवकांची उपाधी* 


शहरातील भिषण पानी टंचाई लक्षात घेऊन तब्ब्ल बारा वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःच्या वॉटर टँकर द्वारे मागेल त्याला मोफत पानी देण्यास सुरुवात केली 

आणि पाहता पाहता एक सदी निघून गेली मात्र त्यांच्या सेवेत कधीच खंड पडला नाही उलट एक टँकर पासून शुरु झालेला प्रवास हा तीन वॉटर टँकर पर्यंत येऊन पोहचला त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन शहर वासि्यांनी त्यांना जलसेवक ही उपाधी दिली.


 *नॉट फॉर रीसेल सिमेंट प्रकरण* 

 *सि. आय. डी. तर्फे तपास व अर्ध्यारात्री अटक*


शहरातील राजकारणात एक तरुण प्रवेश करतो आणि आपल्या सामाजिक व राजकीय कार्याद्वारे संपूर्ण जिल्ह्यात आपल्या नावाचा ठसा उमटवितो हे प्रस्थापित राजकारण्याच्या जिव्हारी लागला 65 वर्षीय निराधार महिलेचे घर आगीत जळाले रातोरात ती महिला रस्त्यावर आली कुठलाही राजकीय स्वार्थ न बघता आदिवासी समाजाच्या या माऊलीसाठी दोन खोलीचा पक्का घर बनवून देणाऱ्या राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा मंदिर स्वखर्चेने बनवून देणाऱ्या समाजसेवकाला 44 सिमेंट पिशवीच्या प्रकरणात अडकविण्यात आले 

यावर सिआयडी तर्फे तपास चालविण्यात आले पोलिसांनी अट्टल गुन्हेगारा सारखे अर्ध्या रात्री अटक केली 

हात मोडला तरी या योद्धाचा कणा मोडला नाही.


पुढील भाग  2.........लवकरच

Post a Comment

0 Comments