मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवासाठी सिने अभिनेत्री रविना टंडन घुग्घुस शहरात*






घुग्घुस: मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवासाठी सिने अभिनेत्री रविना टंडन शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता घुग्घुस येथील बांगडे लेआऊट, मिना बाजार ग्राउंड, बँक ऑफ इंडिया रस्ता घुग्घुस येथे येणार आहे. सोबत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मा.आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, चंद्रपूरचे लोकप्रिय आमदार श्री. किशोरभाऊ जोरगेवार तथा घुग्गूसचे भूमिपुत्र व राजुरा विधानसभा आमदार श्री देवरावदादा भोंगळे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी दिली आहे.


घुग्घुस शहरात दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुद्धा १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवासाठी दरवर्षी सिने अभिनेत्रिंना बोलाविण्यात येते. यापूर्वी मराठी सिने अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि प्राजक्ता माळी यांना कार्यक्रमासाठी बोलविण्यात आले होते. दरवर्षी महिला मोठया उत्साहात हा कार्यक्रम पार पडतात 


कार्यक्रमाचे आयोजन प्रयास सखी मंच घुग्घुस व भाजपा महिला आघाडी घुग्घुसतर्फे करण्यात आले आहे.


स्पर्धकांनी क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवात भाग घ्यायचे असल्यास त्यांनी आपली नावे मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, घुग्घुस येथे नोंदवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments