लॉयड्स मेटल्सच्या नराधमाची महिलेकडे शरीर सुखाची मागणी? घुग्घूस पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

 



घुग्घूस : आजच्या काळात एकट्या महिलेला समाजात जगणे खूपच कठीण झालेले आहे शहरातील लॉयड्स मेटल्स कंपनीत गेल्या तीन वर्षांपासून मजुरी करणाऱ्या महिलेवर कंपनीत ठेकेदारी करणाऱ्या करन कोहली या ठेकेदाराची वाकडी नजर पडली.


हा वासनांध ठेकेदार तिला पैश्याची लालच देऊन शरीर सुखाची मागणी करायचा रात्री अपरात्री फोन करून अश्लील संभाषण करायचा महिलेला दमदाटी करायचा या शैतानाने अक्षरक्षा या निराधार महिलेचा जगणं हराम केला याचा त्रास असहनीय झाल्याने सदर महिलेने पोलीस स्टेशनला तक्रार दिली

असता घुग्घूस पोलीस स्टेशन येथे ठेकेदारा विरोधात विनयभंग व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक अधिनियम अंतर्गत 1989 कलम 2023 भादंवी 75 व 3(2) (VA )नुसार 24फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.


सदर प्रकरणात गुन्हा दाखल होताच कंपनी परिसरात खळबळ माजली ठेकेदाराकडे काम करणारे अथवा त्यांच्या ओळखीच्या लोकांनी महिलेवर तक्रार मागे घेण्याचा तगादा लावला आहे.

सदर प्रकरण हे अनुसूचित जाती जमातीशी संबधित असल्यामुळे अट्रॅसिटी ऍक्टनुसार कारवाई हे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याशी संबधित असल्यामुळे ते घुग्घूस स्टेशनला आले होते.

प्रकरण संदर्भात त्यांच्याशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या संदर्भात कुठली ही प्रतिक्रिया दिली नाही.

लॉयड्स मेटल्स व अन्य कंपनीत आधीच महिलांना रोजगार मिळत नाही.

आणि रोजगार मिळाला तर महिलांना सुरक्षा मिळत नाही.


शासनाने यागंभीर प्रकरणाची दखल घेऊन कामावरील महिलांना सुरक्षा द्यावी व ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी होत आहे

Post a Comment

0 Comments