घुग्घूस : शहरातील वर्धा नदीच्या चिंचोली व हल्ल्या घाटातून दररोज ट्रॅक्टर व हायवा सारख्या वाहणाने दिवसरात्र अवैध रेती तस्करी केली जात आहेत.
आणि आश्चर्याची बाब म्हणजेच ही तस्करी पोलीस स्टेशन समोरूनच केली जात असल्यामुळे रेती तस्कर जोमात तर पोलीस प्रशासन कोमात अशी नागरिकांत चर्चा आहेत.
शहरात गेल्या अनेक महिन्यापासून दिवसा वेकोलीच्या कारगिल चौकातून व रात्रीच्या वेळेस चक्क पोलीस स्टेशन समोरूनच रेती तस्करी केल्या जात आहेत.
शहरातील सर्वसामान्य नागरिकांना ही चोरी उघड्या डोळ्याने दिसते मात्र पोलीस प्रशासन महसूल विभाग तहसीलदार यांना दिसत नाही हे आश्चर्यकारक व चिंतनीय बाब आहे
ही चोरी पोलिसांना ही उघड्या डोळ्यांनी दिसावी म्हणून पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी साहेबांनी विशेष चष्म्यांची व्यवस्था करावी अशी मागणी ही नागरिक करीत आहेत.
शहरातून रात्रीच्या वेळेस चालणाऱ्या रेती तस्करांच्या ट्रॅक्टरच्या आवाजाने दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या नागरिकांची झोप मोड होत असते.
मात्र सर्वसामान्य नागरिकांची चिंता सध्या कुणालाच दिसत नाही.
रेती तस्करीला शासन ही जवाबदार असून रेती घाटांचे लिलाव होत नसल्याने अवैध चोरीचा जोम वाढला आहेत.
मात्र यासंपूर्ण प्रकारात सर्व सामान्य नागरिकांचा घर बनविण्याचा स्वप्न धुळीस मिळाला आहे.
घर सोडा या महागडया चोरीच्या रेतीने साधा शौचालय ही बांधता येत नाही ही शोकांतिका आहे
शासन व प्रसासनाने यागंभीर विषयाकडे लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे


0 Comments