महानगर पालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका दिवाळीत?

 




चंद्रपूर : महाराष्ट्र विधानसभेच्या दणदणीत विजया नंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजेच महानगरपालिका जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुका घेण्यासाठी महायुतीची तैयारी असतांना देखील या निवडणुका आता दिवाळीतच होईल अशी शक्यता दिसत असल्यामुळे 

राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनमध्ये नाराजी पसरली आहेत.


ओबीसी आरक्षणा बाबत सर्वोच्च न्यायालयात शुरु असलेल्या सुनावणीत 25 फेब्रुवारी 2025 रोजी होत असलेली सुनावणी ही आता मंगळवारी 04 मार्च रोजी होणार असून सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने 25 महानगरपालिका व जिल्हापरिषदेच्या निवडणुका आता दिवाळीतच होणार अशी शक्यता दिसत आहे.


04 मार्च रोजी न्यायाल्याने निवडणुका घेण्याची परवानगी दिल्यास सर्वप्रथम मतदार यादी निश्चित करण्याचा कार्यक्रम होईल मतदार यादी जाहीर करून हरकती व सूचना मागितल्या जातील 

नवीन प्रभाग रचना केल्यास त्याला ही वेळ लागेल आणि यामधात पावसाळा असल्यामुळे निवडणुका पावसाळ्यात घेण्याची शक्यता अंत्यन्त कमी असल्यामुळे निवडणुका साठी आता प्रतीक्षा करावी लागेल


घुग्घूस नगरपरिषदेच्या निर्मितीला पाच वर्षाचा कार्यकाळ होत असतांना देखील निवडणुका न झाल्यामुळे शहराचा विकास रखळला असून नागरिकांना प्रचंड त्रास भोगावा लागतं आहे.

यातून अजून ही सुटका नाहीच

Post a Comment

0 Comments