घुग्घूस शहर भुमापन नक्षा योजनेचा उदघाटन संपन्न राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची लक्षवेधी उपस्तीथी

 








घुग्घूस : केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागातर्फे 26 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थे अंतर्गत येणारे 152 शहराची निवड करण्यात आली 

 

या शहरातील अचूक भूमीमापनासाठी नवीन टेकनिकल पद्धतीचा वापर करण्यात येत असून यामध्ये तीन टप्प्यात भुमापन करण्यात येईल पहिल्या टप्प्यात हेलिकॉपटरचा वापर करून शहराची सीमारेखा अधोरेखित करण्यात येईल.

सदर योजनेचा उदघाटन केंद्रीय कृषी व किसान कल्याण तथा ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौव्हाण यांच्या हस्ते मध्य प्रदेश येथील रायसेन येथे करण्यात आले याप्रसंगी केंद्रीय मंत्री यांनी नक्षा कार्यक्रमाचा उद्देश्य सांगितले की शहरी क्षेत्रातील जमिनीचा रेकॉर्ड निर्माण करणे 

त्यांना अपडेट करणे भूमी मालकांची विश्वासदायक माहिती गोळा करणे  हा असून यामुळे नागरिकांना जमिनी संदर्भातील अचूक माहिती सहज उपलब्ध होईल व जमिनीची ओळख करणे सोपे होऊन नागरिकांतील व भाऊ बंधकीतील जमिनीचा वाद सहज सोडविता येईल.

घुग्घूस शहरात पहिल्या टप्प्यातील मोजणीसाठी हेलिकॉप्टर द्वारे 42 फेऱ्या घेण्यात आल्या आहेत.


याकेंद्रीय योजनेत चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस शहराची निवड करण्यात आली असून घुग्घूस नगरपरिषदेच्या वतीने आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी बालाजी लॉन येथे नक्षा प्रोजेक्ट योजनेचा नक्षा कार्यक्रम उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला 

सदर कार्यक्रनात भूषण मोहिते जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख, तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार,नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी वाघ, व नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी, सन्माननीय पत्रकार शहरातील राजकीय पक्षाचे नेते व नागरिकगन मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments