निवडणूक आयोगाने दाखविला सर्वोच्च न्यायालयाला ठेंगा! 28 दिवसात अधिसूचना काढण्याचा निर्देशाला दाखविली केराची टोपली?

 





चंद्रपूर : देशात सध्या काय शुरु आहे काही कळायला मार्गच उरलेला नाही

निवडणूक आयोग आता यादेशात कोणाची ही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही किंवा कोणाच्या तरी हाताचे बाहुले झालेले आहेत.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोन ते तीन वर्षांपासून झालेल्या नाही शहरातील व गावातील विकासकामे खोळंबली आहेत

नगरपालिका व जिल्हापरिषदेच्या संपूर्ण सत्ता नोकरशाहीच्या हातात आहे.

लोकशाही धोक्यात आलेली आहे.


निवडणुका या लोकशाहीचे प्राण आहेत असे संबोधित करीत सर्वोच्च न्यायालयाने 06 मे 2025:रोजी निवडणूक आयोगाला 28 दिवसात अधिसूचना जाहीर करण्याचे निर्देश दिले होते.

02 जून रोजी या निर्देशांची मुद्दत संपलेली आहेत.

निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशालाच ठेंगा दाखविला आहेत.

आता यावर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते निवडणूक आयोग पुन्हा काय गोळी देते हे येणारा काळच सांगेल?

Post a Comment

0 Comments