घुग्घूस :जवळील ए सी सी सीमेंट (अदानी) चांदा सिमेंट वर्क्स येथे काम करत असताना एका कामगाराच्या अंगावर न्यू क्लिनर सायलो गेट पडल्याने गंभीर जखमी होण्याची दुर्घटना घडली.
जखमी कामगाराचे नाव नितेश विनायक बावणे आहे. नितेश बावणे यांच्या हात, पाय आणि छातीला गंभीर दुखापत झाली असून, नाकातून रक्तस्त्राव झाल्याने त्यांना तातडीने चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले
. परंतु, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
उपाययोजनाः
👉जखमी कामगाराला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
👉या घटनेची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
👉या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
👉कामाच्या ठिकाणी सुरक्षा उपायांचे पालन करणे आवश्यक आहे.


0 Comments