घुग्घूस : शहरात दर रविवारी आठवडी बाजार हा मोठ्या प्रमाणात भरत असल्यामुळे तसेच ग्रामीण भागातून व्यापारी व ग्राहक शहरात येत असल्यामुळे बाजार परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होते.
बाजाराला लागलेला मुख्य मार्गांजवळ दुकानें तसेच ग्राहकांच्या दुचाकी वाहने उभे असतात कारण याठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही.
या मार्गांवर एसीसी कंपनीचे जडवाहन दिवसभर चालत असतात यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
घुग्घूस शहरात आसिफराजा हे पोलीस निरीक्षक असतांना रविवारी दुपारी 03 ते रात्री 10 वाजेपर्यंत एसीसी कंपनीची जडवाहतूक बंद करण्यात आली होती.
याच धर्तीवर रविवारी दुपारी 03 ते रात्री 10 वाजेपर्यंत एसीसी कंपनीची जडवाहतूक बंद करावी अशी मागणी
भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकारणीने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांना निवेदनातून केली आहे.
याप्रसंगी महिला नेत्या सुरेखा तोडासे,
भारती सोदारी ,राजेश्वारी सोदारी,सुनंदा सोदारी, अनिता गोवर्धन, बेबी शिरपेल्ली,प्रीती रेड्डी,रूपा गोदारी,सुजाता वाघमारे,नीता लामगे,गुलशन शेख, नसरीन शेख व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते


0 Comments