घुग्घूस : शहरातील नगरपरिषदेचे भोंगळ कारभार व भ्रष्टाचाराचे प्रकरण दिवसां - दिवस उजेडात येत आहे.
नुकतेच 19 जून रोजी निष्क्रिय नगरपरिषदेच्या विरोधात महिला काँग्रेस द्वारे " थोडी चुडिया पहन लो' आंदोलन करण्यात आले यात आंदोलनकर्त्यानी गली - गली मे शोर है, नगरपरिषद कामचोर है, च्या घोषणा दिल्या मात्र समोर आलेल्या धक्कादायक प्रकरणाने गली - गली मे शोर है, नगरपरिषद चोर है
मनायची वेळ आलेली आहे.
नगरपरिषदेत मुख्याधिकारी यांच्या कार्यलयासमोर नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
हे बांधकाम इतक्या निकृष्ट दर्जाचे आहे की इमारत कोसळून भविष्यात अनेकांचे जीव घेणार आहे.
कुठल्याही इमारतीचा पाया हा मजबूत असायला हवा तेव्हाच इमारत टिकेल या इमारतीच्या निर्माण कार्यात जे पिल्लर उभे केले आहे.
त्यामध्ये कमी सिमेंट व अन्य साहित्याचा कमी वापर केल्याने पिल्लर मधील काँक्रेट गळून पडला ते लपविन्यासाठी त्याच्यावर पुन्हा सिमेंटचा प्लास्टर करण्यात आला आहे.
मात्र हे धोकादायक आहे हे सर्व नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निलेश रांजनकर व इंजिनियर यांच्या डोळ्या देखत होत आहे.
नगरपरिषदेत इतके निकृष्ट कामे होत असेल तर शहरात होणाऱ्या विकासकामाच्या दर्जाबद्दल न बोललेलच बरं आहे.
या काममध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारातून अधिकाऱ्यांना मोठा कमिशन मिळत असल्याची शक्यता नाकारता येत नाही?
मलाईच्या या खेळात शहराचा सत्यानाश करण्यात येत आहे.
दुसरी मोठी चोरी उघड? पार्ट 02


0 Comments