घुग्घुस: येथून जवळच असलेल्या घुग्घुस-चंद्रपूर मार्गावरील धानोरा फाटा टोल नाक्यावर २१ जुन रोजी पाहाटे ३:३० वाजताच्या सुमारास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा व घुग्घुस पोलिसांनी सापळा रचून गोवंशाची तस्करी करणारे ६ आयशर ट्रक पकडले.
भंडारा जिल्ह्यातील मोहदा येथून ६ आयशर ट्रकमध्ये गोवंशाचे ७२ नग कोंबून भरून कत्तलीकरिता तेलंगना राज्यातील साटापूरकडे घुग्घुस मार्गे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली माहितीच्या आधारे पोलिसांनी धानोरा फाटा टोल नाक्यावर सापळा रचून ६ आयशर ट्रक पकडले.
१५ आरोपीना अटक करण्यात आली असून ३ आरोपी फरार आहे. १ करोड ७० लाख ७० हजारांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला. ७२ नग गोवंशाची सुटका करून गोशाळेत पाठविण्यात आले.
ही कारवाई चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. बलराम झाडोकार, पोउपनि. विनोद भुरले, संतोष निंभोरकार, सुनील गौरकार, प्रशांत नागोसे, सुभाष गोहोकार, घुग्घुसचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन तायवाडे, नितीन मराठे, सचिन वासाडे, शंकर मन्ने, सचिन बारसागडे यांनी केली.


0 Comments