योगाला जीवनशैलीचा भाग बनवा: विवेक बोढे घुग्घुस भाजपातर्फे जागतिक योगदिन उत्साहात साजरा

 





घुग्घुस: येथील भाजपातर्फे शनिवार २१ जुन रोजी सकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत प्रयास सभागृहात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साजरा होणारा ११ वा जागतिक योगदिन भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या नेतृत्वात उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 


मनोगत व्यक्त करतांना भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे म्हणाले, योगाला आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवा, योगामुळे शाररिक व मानसिक आरोग्य चांगले राहते तणावावर मात करण्यासाठी दररोज योगा करायला पाहिजे,  त्याने मानसिक स्थैर्य लाभते व मनात सकारात्मक विचार निर्माण होते.


योग शिक्षक अनील नित यांनी प्रात्यक्षिके व योगाभ्यास घेतला. २१ जुन हा दिवस जागतिक योगदिन म्हणून साजरा केला जातो.


यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, पतंजली योग समितीचे अनिल नित, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रेमलाल पारधी, प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, चिन्नाजी नलभोगा, कुसुम सातपुते, हेमंत पाझारे,अनघा नित, सुरेंद्र जोगी, बबनराव बोढे, विना बांगडे, विना घोरपडे, डॉ. वऱ्हाटे, मुस्तफा शेख, वंदना मुळेवार, सुशील डांगे, सिनू कोत्तूर, मॉर्निंग ग्रुप, फ्रेंड्स ग्रुप, महिला पतंजली योग समिती, प्रयास योग समिती, शिक्षकवृंद आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments