नागपूर :- पोलिसांनी मोठी कारवाई करीत शिक्षक भरती घोटाळयातील आरोपी भाजपा नेता दिलीप धोटे यांना अटक केली आहे.
बोगस शालार्थ आय. डी. प्रकरणात सायबर पोलिसांनी 5 शिक्षकांचे बनावट आय. डी तयार करून त्यांच्या 10 वर्षाच्या अरियसची रक्कम ही या भाजपा नेत्यांनी हडप केल्याचा आरोप आहे.
त्यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठळी सुनावण्यात आली आहे.
शिक्षक भर्ती घोटाळयात प्रमुख आरोपी वेतन अधिक्षक निलेश वाघमारे यानेच याप्रकरणातील बनावट आय. डी. तयार केल्याचे तपासात उघड झाले आहे.
भाजपा नेते दिलीप धोटे यांना 5 शिक्षकांच्या बनावटी आय. डी. तयार केल्या प्रकरणी अटक केली आहे
काही वर्षापूर्वी धोटे यांनी 8 शिक्षकांची बोगस कागदपत्रच्या आधारे शाळेत नियुक्ती करून अधिकाऱ्यांच्या मदतीने शालार्थ आय. डी. बनवून घेतली
या बनावटी शिक्षकांकडून लाखो रुपये घेत त्यांना नोकरीवर लावण्यात आले
धोटे हे कळमेश्वर तालुक्यातील मोहपा येथील भाजप नेते आहेत.
त्यांच्या संस्थेच्या कळमेश्वर तालुक्यातील प्रतिभा उच्च प्राथमिक शाळा व धापेवाडा पब्लिक स्कूल अश्या दोन शाळा आहेत.
शिक्षक भर्ती घोटाळा प्रकरणात संस्था चालकांना अटक करण्याचे सत्र सुरु असून आता पर्यंत शिक्षक भर्ती घोटाळ्यात 9 जणांना अटक करण्यात आली आहे.
यापैकी बहुतांश हे शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी व दलाल आहेत.
आता पर्यंत 4 शिक्षण उप - संचालक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
एकंदरीत या प्रकरणात टप्प्या - टप्प्याने जवळपास 20 ते 22 जणांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणात गोंदिया येथील संस्था चालकाला देखील अटक करण्यात आली असून याचे लोन चंद्रपूर पर्यंत पोहचण्याची ही शक्यता आहे?


0 Comments