घुग्घूस : औद्योगिक शहरात दररोज हजारोच्या संख्येने हायवा व ट्रॅक चालत असतात शहरातील घुग्घूस ते वणी मार्गांवरील बेलोरा पुलापासून फिल्टर प्लांट ते सुभाष नगर कॉलनी पर्यंत जागोजागी जाडवाहने उभे असतात मागील महिन्याभरात उभ्या वाहनाला दुचाकीची धडक लागून दुचाकी चालकांची मृत्यू झाल्याचे अनेक प्रकरण समोर आलेले असतांना दिनांक 17 जून रोजी बंगाली कॅम्प कॉलनी जवळ विजय प्रताप यादव यांचा अपघात झाला सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघाताची मालिका निरंतर सुरु असल्यामुळे आ.किशोर जोरगेवार यांच्या मार्ग दर्शनात, तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष अनुप भंडारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठ मंडळाने पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांना निवेदन देऊन रस्त्यावर उभे राहणाऱ्या जाडवाहणावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याप्रसंगी भाजप नेते इम्रान खान, वनिता निहाल, संध्या जगताप, माया मांडवकर, अलका भंडारकर व अन्य पदाधिकारी नागरिकगन उपस्थित होते.


0 Comments