घुग्घूस : गुजरात येथील अहमदाबाद येथून ब्रिटन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात विमानातील तसेच विमान ज्याठिकाणी कोसळले त्या मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी व नागरिक मृत्यूमुखी पडलेत
या दुःखद घटनेने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे.
घुग्घूस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा तर्फे दिनांक 13 जून 2025 रोजी गांधी चौक येथे सांयकाळी 7:30 वाजता श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला मृतकांना पुष्प अर्पित करून व दोन मिनिटांचा मौन धारण करून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली
याप्रसंगी शिवसेना अध्यक्ष बंटी घोरपडे,युवा सेना उपजिल्हा प्रमुख हेमराज बावणे, युवा नेते अमित बोरकर, ज्येष्ठ नेते प्रभाकर चिकनकर, ज्येष्ठ नेते अजय जोगी, ज्येष्ठ नेते बाळू चिकनकर, युवा सेने नेते चेतन बोबडे, वरिष्ठ नेते गणेश शेंडे, , उप - तालुका प्रमुख योगेश भांदककर, ज्येष्ठ नेते रघुनाथ धोंगडे, गणेश उईके, मारोती जुमनाके वेदप्रकाश मेहता, गजानन बांदूरकर, लक्ष्मण बोबडे, अनुप कोगरे, किशोर चौधरी, हर्ष चौधरी, राजू नातर, प्रफुल खोंडे, आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.


0 Comments