घुग्घूस : - शहरातील प्रतिष्ठीत व्यक्ती तसेच पुण्य नगरी दैनिक वर्तमानपत्राचे
शहर प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते
सुरेश खडसे यांनी आज दिनांक 11 /06/ 2025 रोजी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली
चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय येथील शरीररचनाशास्त्र विभागात जाऊन मरणोत्तर देहदानाची कागदोपत्री कारवाई पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवून घेतले एका आठवड्यापूर्वी शहरातील अमराई वॉर्ड निवासी राजू पखाले यांनी रेड्डीजी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मरणोत्तर देहादानाचा संकल्प घेतला होता हे विशेष
खडसे यांचे भाचे मोहीत राजेंद्र झोटिंग यांचा आजारपणात अंत्यन्त युवा अवस्थेत मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे मृतदेह वैद्यकीय रुग्णालय नागपूर येथे देहदान करण्यात आले मुलासमान भाच्याचा देहदान केल्यानंतर आता आपण ही समाजाच्या कामी पडायचं समाजाला एक उत्कृष्ट डॉक्टर मिळावा म्हणून आपण ही देहदान करायचं हा संकल्प आपण घेतला होता.
कुटुंबियांशी चर्चा करून त्यांचे मन वळविण्यात यश प्राप्त झाल्याने आज देहादानाचा संकल्प पूर्ण केला आहे
असे मत व्यक्त केले
याप्रसंगी सैय्यद अनवर, रोशन दंतलवार, बालकिशन कुळसंगे हे उपस्थित होते.


0 Comments